Wednesday, 24 May 2023

कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय?


कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय?


बॉ लिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' चित्रपटाच्या बाबतीत चर्चेत आहे. चित्रपटाचे शुटींग संपले असून पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. प्रियांका नेहमी काही ना काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती तिची मुलगी मालती सोबत वेळ घालवणे पसंत करते. आता बातमी अशी आहे की, तिने अलिकडेच एका ब्रँडसाठी फोटोशूट केलेय, ते ही कॅलिफोर्नियाच्या टोपांगा माऊंटेन्सच्या जंगलात तिने हे फोटोशूट केले. तिने यावेळी हॉटनेसचा तडकाच दिला आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. एका फोटोत ती हिरव्या गवतावर झोपलेली दिसत आहे, तिच्या हातावर जगाचा नकाशा देखील • दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिचा बोल्ड अंदाज दिसून येतोय.




No comments:

Post a Comment

कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय?

कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय? बॉ लिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' चित्रपटा...